anekant.news@gmail.com

9960806673

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा साखर कोटा घटविला

गुजरात, राजस्थान, तमिळनाडूच्या कोट्यात वाढ
कोल्हापूर ः केंद्राने जानेवारीच्या साखर कोट्याचे वितरण करताना महाराष्ट्राचा साखर कोटा डिसेंरच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घटविला आहे. कर्नाटक वगळता कमी साखर उत्पादन असणार्‍या गुजरात, रातस्थान, तमिळनाडू आदी राज्यांच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे.
सध्या साखर उत्पादनात महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही राज्यांच्या विक्री कोट्यात जानेवारीत घट करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या कोट्यातही 9 टक्क्यांची घट करण्यात आली. उत्तर प्रदेशला 7 लाख 22 हजार टन साखरेच्या विक्रीला परवानगी देण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 48 टक्क्यांची घट झाली आहे.
डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 7 लाख 99 हजार 455 टनांचा कोटा दिला होता. जानेवारीम यामध्ये 84 हजार 104 टनांची घट करू न हा कोटा 7 लाख 15 हजार 351 टनांवर आणण्यात आला आहे. कर्नाटकला मात्र गेल्या महिन्यात तुलनेत 22 टक्क्यांनी वाढवून देण्यात आला. 4 लाख 87 हजार 424 टनांचा कोटा कर्नाटकसाठी देण्यात आला.
सध्या 20 राज्यांमध्ये साखर उत्पादन सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक ही राज्ये साखर उत्पादनात आघाडीवर आहेत. केंद्राने साखर कोटा देताना कमी साखर उत्पादन करणार्‍या राज्यांना अतिरिक्त कोटा दिला आहे. या राज्यातील कारखान्यांना जास्त साखर विक्री करावी, अशा उद्देशाने गेल्या महिन्याच्या तुलनेत साखर कोट्यात अदलाबदल करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी असल्याने केंद्र सरकार साखर विक्रीबाबत सातत्याने लक्ष ठेवून आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारचा कोटा 1 लाख टनांनी कमी करण्यात आली आहे. साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी कारखान्यांच्या साखर विक्रीवर केंद्राचे सातत्याने लक्ष आहे. यामुळेच किरकोळ बाजारात साखरेचे दर नियंत्रित राहत असल्याचे केंद्रिय सूत्रांनी सांगितले. (अ‍ॅग्रोवन, 31.12.2023)