मुंबई ः सहवीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी राज्यातील 6 सहकारी साखर कारखान्यांना एकूण 2 कोटी 40 लाखांचे भागभांडवल मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकारी कारखान्यामार्फत सहवीजनिर्मिती प्रकल्प राबविण्याच्या धोरणाला अनुसरून राज्यातील 6 कारखान्यांना शासकीय भागभांडवलासाठी एकूण 2 कोटी 40 लाख रूपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहकार व पणन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
यात रेणा साखर कारखाना-लातूर (4.68 लाख) ज्ञानेश्वर कारखाना-कोल्हापूर (40.61 लाख), शरद साखर कारखाना-कोल्हापूर (13.75), कुकडी साखर कारखाना-अहमदनगर (35.83 लाख) स.म.शिवाजीराव नागवडे साखर कारखाना-अहमदनगर (69.94 लाख) आणि राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे-सांगली (75.19 लाख) असे एकूण 2 कोटी 40 लाख इतके शासकीय भागभांडवल सहवीजनिर्मितीसाठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (पुढारी, 04.01.2024)