anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोडणी कामगारांना वाढीव मजुरी नोव्हेंबरपासूनच

टायरगाडीला टनाला मिळणार 458 रूपये मजुरी
नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या मजुरीत दरात वाढ करण्याबाबतचा करार होऊन 34 टक्के वाढ झाली आहे. 4 जानेवारी 2024 ला हा करार झाला असला तरी यंदाच्या हंगामाच्या सुरूवातीपासूनच (नोव्हेंबर) नव्या करारानुसार दरवाढ मिळणार आहे. नव्या करारामुळे राज्यातील 12 लाख ऊसतोड कामगारांना मोठी वाढीव रक्कम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोड तोडणी वाहतूक, कामगार, मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 35 वर्षात 12 वेळा दरवाढ झाली असल्याचे ते म्हणाले.
श्री. थोरे पाटील यांनी सांगितले की ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ करावी यासाठी यंदा मजुरांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच उसाचे क्षेत्र कमी असल्याने संपाचा फारसा प्रभाव दिसला नसला तरी मजुरांच्या दराबाबतचा कराराचा कालावधी संपला असल्याने दरवाढीबाबत करार करण्याचाी मागणी सुरूच होती.
आतापर्यंत 12 वेळा दरवाढ झाली बहुतांश वेळा शरद पवार, गोपीनाथ मुंडे, बबनराव ढाकणे यांचा पुढकार राहिला. 35 वर्षांत 350 रूपयांपासून 420 रूपयांपर्यंत प्रतिटनामागे दरवाढ मिळाली असल्याचे थोरे म्हणाले. यंदा नोव्हेंबरपासून ही दरवाढ मिळेल असे त्यांनी सांगितले.
मिळणार वाढीव मजुरी -
* प्रतिटन रक्कम (कंसात अगोदर मिळणारी रक्कम)
* टायर बैलगाडी ः 451 रूपये 28 पैसे (337 रूपये) (पहिला किलोमीटर)
* गाडी सेंटर - 409 (304)
* डोकी सेंटर ः 367 (273)
* टायर बैलगाडी प्रति किलोमीटर ः 20 रूपये 47 पैसे (15 रूपये 27 पैसे) (अ‍ॅग्रोवन, 15.01.2024)