anekant.news@gmail.com

9960806673

अथणी शुगर्सची सर्व बिले जमा ः योगेश पाटील

बांबवडे ः अथणी शुगर्स लि. शाहुवाडी युनिट कारखान्याने डिसेंबरअखेरची बिले शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली. चालू हंगामात दैनंदिन गाळप 5500 मे.टन प्रतिदिन होत असून कारखान्याने 66 दिवसांत 2,55,370 मे.टन गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 11.30 टक्के मिळाला असून 2,67,660 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असून कारखान्याने 31 डिसेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम अदा केली आहे. याशिवाय तोडणी वाहतूकीची सुद्धा बिले देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. (लोकमत, 17.01.2024)