भारतीय शुगरच्या विविध पुरस्कारांची घोषणा
श्रीपूर ः येथील पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना भारतीय शुगरच्या वतीने देण्यात येणारा देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय शुगर ही साखर उद्योगातील अग्रमानांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या पातळीवर सत्तरहून अधिक पुरस्कारांचे वितरण केले जातेे. यंदाचे पुरस्काराचे घोषणा करण्यात आली आहे. त्यात राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार डॉ. यशवंत कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. 50 हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (सकाळ, 25.01.2024)