anekant.news@gmail.com

9960806673

तीन साखर कारखान्यांच्या थकहमीचे 44 कोटींचे घेणे

जळगाव ः कर्जोद सहकारी साखर कारखाना, बेलगंगा व संत मुक्ताबाई या 3 साखर कारखान्यांना राज्य शासनाने दिलेल्या थकहमीची 43 कोटी 77 लाख रूपये जिल्हा बँकेचे शासनाकडे येणे आहे. जिल्ह्यातील विकासोंच्या अनिष्ट तफावतीची 600 कोटींची रक्कम मिळणे व जिल्हा परिषदेच्या 700 कोटींच्या ठेवी जिल्हा बँकेत ठेेवणे यासंदर्भात सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी 27 जानेवारी रोजी नाशिक येथे 26 जानेवारीला बैठक बोलावली होती.
जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांना जिल्हा बँंकेने कर्ज पुरवठा केलेला आहे. राज्य शासनाने या कर्जाची हमी घेतली आहे. आता 3 ही कारखान्यांची विक्री झालेली आहे. रावेर साखर कारखान्याकडे 27 कोटी 3 लाख, बेलगंगा कारखान्याकडे 7 कोटी 46 लाख व संत मुक्ताबाई कारखान्याकडे 9 कोटी 27 लाख रूपये जिल्हा बँकेचे घेणे आहे. जिल्हा बँंकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ही रक्कम मिळणे आवश्यक असल्याने जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. (लोकमत, 26.01.2024)