गवण ः इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी संपत बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. कर्मयोगी कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. बैठकीत तज्ज्ञ संचालक पदासाठी संपत बंडगर यांचे नाव सुचविण्यात आले. त्यानंतर सर्वसंमतीने तज्ज्ञ संचालक म्हणून संपत बंडगर यांची निवड करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. (सकाळ, 09.02.2024)