राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
विशेष म्हणजे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकार साखर संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तसेच पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
तसेच राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी गुजरात मधील केतनभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.