हमिदवाडा ः येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये 1 ते 15 जानेवारी 2024 अखेरची गळितास आलेल्या उसास प्रतिटन 3150 रूपये प्रमाणे होणारी 16 कोटी 86 लाख 87 हजार इतकी रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारखान्याने 20 फेब्रुवारी अखेर 3 लाख 81 हजार 930 मे.टन उसाचे गाळप करून 4 लाख 38 हजार 100 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 11.61 टक्के इतका आहे. तसेच या हंगामामध्ये 1 कोटी 56 लाख 67 हजार 200 युनिट वीज ही वीज वितरण कंपनीस निर्यात केली आहे. कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्पही उत्तम प्रकारे चालू असून आज अखेर 14 लाख 22 हजार 129 लिटर स्पिरीटचे उत्पादन झाले आहे. (पुढारी, 22.02.2024)