गडहिंग्लज ः आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन कारखान्याचा निरोप घेतला. 1 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. नंतर 4 महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण समजले नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. (लोकमत, 16.03.2024)