anekant.news@gmail.com

9960806673

।। अहो आले आले इलेक्शन ।।

अहो आले आले इलेक्शन ।नका घेऊ फार टेन्शन ।
वापरा अस्र कनेक्शन ।संधि आहे करा कलेक्शन ।।
मतदाराला कर आर्जव आमिष दाखव ।
अरे मनी नाही भाव।म्हणे मतदारा मला पाव ।।
अरे अशाने मतदार पावायचा नाय ।
मतदार काही बाजारचा भाजीपाला नाय।।
आरोग्य, नोकरी लोकांचे रोजचे प्रश्न ।
दूर दूर दिसेना महिला आरक्षण।।
वाटा जात, पात, धर्माच्या अफुच्या गोळ्या।
द्या मोफत शिक्षणाच्या बावळया ।।
अन्न, वस्र, निवारा, पाणी, प्रदूषण।
आतंकवाद , बाबा की आणखी कोण ।।
येऊन येऊन येणार कोण ।
साहेबा शिवाय आहेच कोण ।।
गरीबी हटाव का गरीब हटाव ।
दुष्काळाचा तालूका माण खटाव ।।
लग्न, मुंज बारसे मयत,दहाव्याला हजर ।
राहिले की आमचे साहेब किती थोर ।।
आम्ही फक्त म्हणायचे लोकशाहीचा महोत्सव।
कोणाची लोकशाही? कोणाचा महोत्सव।।
कुणी म्हणेल मग एवढी वर्ष काय केले ।
प्रश्न अंशत: सुटलेत , बहुतांश तसेच रेंगाळले।।
का होताहेत अक्राळ विक्राळ शहरं निर्माण ।
कुठे हरवलाय अंत्योदय ? कुठे गेलाय रामबाण ।।
अजूनही कितीतरी लोकांची पोटाची आग विझते।
त्यांसाठी व्यक्ती स्वातंत्र्याची आहुती द्यावी लागते।।
याच अगतिकतेतून त्याचे मत विकले जाते।
बहुमोल मताची कवडीमोल किंमत होते।।
अजूनही कितीतरी लोक फक्त एक वेळचे जेवतात।
पण निवडणूक जाहीरनामा, झेंडे पोस्टर लावतात ।।
त्यांना बोकड ,कोंबड्या ,दारूचा नैवेद्य दाखवतात।
निवडणुकीच्या उत्सवात असेच खेळ खेळतात ।।

रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२