लातूर ः चालू गाळप हंगामात जागृती शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि.ने 7 लाख 2 हजार 309 मे.टन उसाचे यशस्वी गाळप केले असून कारखान्याने पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप 31 मार्चअखेर पूर्ण केले आहे. राज्यात ऊस उत्पादक शेतकर्यांना एफआरपीपेक्षा अधिक भाव देणार्या व खाजगी साखर उद्योगात भरारी घेत असलेल्या लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील जागृती शुगरने चालू गाळप हंगामातील सांगता समारोप कारखानास्थळी विधिवत पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. (एकमत, 07.04.2024)