anekant.news@gmail.com

9960806673

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संपूर्ण ऊस बिल हंगामअखेर अदा

कामगारांना एक महिन्याचा पगार बक्षीस ः आ. बबनराव शिंदे

टेंभूर्णी ः विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये पिंपळनेर युनिट व करकंब युनिटचा यशस्वी गाळप करून या हंगामात दोन्ही युनिटकडे हंगामअखेरपर्यंत गाळपास आलेल्या उसास अनुदानासह संपूर्ण ऊस बिलाचे पेमेंट व ऊसतोडणी वाहतूक वेळेत अदा केलेली असून हंगामअखेर ऊस बिल अदा करणारा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बबनराव शिंदे यांनी दिली.

आ. शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिट व करकंब युनिटच्या 2023-24 गळीत हंगामाची सांगता झाली असून दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचे संपूर्ण उसाचे गाळप केलेले आहे.

2023-24 गळीत हंगामामध्ये युनिट नंबर 1 कडे 18 लाख 92 हजार 949 मे.टन उसाचे गाळप होऊन 11 टक्के साखर उतार्‍याने 19 लाख 28 हजार 850 क्विंटल साखर पोती उत्पादित झाली आहेत. तसेच युनिट नं.2 कडे 6 लाख 25 हजार 888 मे.टन उसाचे गाळप होऊन 11.14 टक्के साखर उतार्‍याने 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून 25 लाख 18 हजार 837 मे.टन गाळप हेऊन 25 लाख 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.

दोन्ही युनिटचे मिळून 10 कोटी 41 लाख 81 हजार 195 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे. या हंगामामध्ये य ुनिट नं.1 डिस्टलरी विभागाकडे शुगर सिरपपासून 95 लाख 84 हजार 76 लिटर, बी हेवी 1 कोटी 25 लाख 93 हजार 251 लिटर व सी हेेवी 84 लाख 2 हजार 740 लिटर इथेनॉल उत्पादन असे एकूण 3 कोटी 5 लाख 79 हजार 967 लिटर इथेनॉल उत्पादन झालेले आहे. तसेच उत्पादित इथेनॉल ऑइल कंपन्यांना सी हेवी 68 लाख 3 हजार, बी. हेवी 42 लाख 93 हजार व शुगर सिरप 95 लाख 82 हजार असे एकूण 2 कोटी 6 लाख 81 हजार पुरवठा करण्यात आलेले आहे.

या हंगामामत दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या उसास हंगामाचे सुरूवातीपासून 10 दिवसांला बिल अदा केले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या उसास पहिला अ‍ॅडव्हान्स प्रति मे.टन 2700 रूपयांप्रमाणे अदा करण्यात आला असून या हंगामात 16 ते 31 जानेवारी प्रतिटन 50 रूपये, 1 ते 28 फेब्रुवारी प्रतिटन 100 रूपये व 1 मार्च 2024 पासून हंगामअखेरपर्यंत प्रतिटन 150 रूपये याप्रमाणे उत्तेजनार्थ अनुदान अदा करण्यात आले आहे.

या हंंगामात हंगाम अखेर अनुदानासाठी एकूण 14 कोटी रूपये अतिरिक्त अदा करण्यात आलेले आहे. कारखान्याने या हंगामात ऊस बिलापोटी 693 कोटी 86 लाख रूपये व 31 मार्च अखेर ऊसतोडणी वाहतूक बिलापोटी 170 कोटी 43 लाख रूपये अदा करण्यात आले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

* या कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्‍यांचे हित जोपासलेले आहे. दोन्ही युनिटकडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांना एक महिन्याचे पगाराइतकी रक्कम बक्षीस म्हणून अदा करण्यात आली आहे. त्यापोटी कारखान्याने 3 कोटी 30 लाख रूपये अदा केले आहेत. 2023-24 हंगामात युनिट नं.1 व युनिट नं.2 कडे गाळप झालेल्या उसाला 10 दिवसाला पेमेंट देणारा, हंगामअखेर ऊस बिलाचे संपूर्ण पेमेंट करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यातील एकमेव कारखाना असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले. (सकाळ, 15.04.2024)