anekant.news@gmail.com

9960806673

साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

पुणे ः साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाला अखेर नवा प्रमुख मिळाला आहे. विभागाचे सहसंचालक म्हणून अविनाश देशमुख यांनी सूत्रे स्वीकारत कामाला सुरूवात केली आहे. श्री देशमुख यांनी कृषी शाखेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. महाराष्ट्र कुषिसेवा परीक्षेच्या 1990 मधील तुकडीतून ते कृषी खात्यात फलोत्पादन अधिकारी म्हणून रूजू झाले.

अलीकडेच राज्याच्या पणन मंडळात गेली चार वर्षे उपसंचालक म्हणून बाजार समिती विभागाचे कामकाज सांभाळत होते. सहसंचालकपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी साखर कारखान्यांमधील इथेनॉल, प्रसेमड, मळीचा बगॅस याच्याशी संबंधित समस्याचा आढावा घेणे सुरू केले आहे.

इथेनॉल निर्मितीमधील अडचणी सोडविण्याबरोबरच सहवीज प्रकल्पांना बळकटी देेणे, उपपदार्थांच्या निर्मितीमधील अडचणी दूर करणे तसेच सौर निर्मितीसारखे अन्य पर्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखान्यांना मत करण्यात उपपदार्थ विभाग सतत प्रयत्नशिल राहील, असे श्री. देशमुख म्हणाले. (अ‍ॅग्रोवन, 07.05.2024)