anekant.news@gmail.com

9960806673

साखरेच्या पॅकिगला ज्यूट धोरणाचा फटका

केंद्राची 20 टक्क्यांची सक्ती ः ज्यूटला 74, पॉलिथीनला 21 रूपये खर्च

सांगली ः केंद्राने ज्यूट बॅगमध्ये 20 टक्के साखर पॅकिंग करण्याच्या धोरणाचा फटका साखर उद्योगाला बसत आहे. पॉलिथीनच्या 50 किलोच्या बॅगसाठी 21 रूपये खर्च येतो, तर ज्यूट बॅगला 74 रूपये खर्च येतो. तेव्हा व्यापार्‍याकडून स्वस्त असलेल्या पॉलिथीन पॅकिंगमधील साखरेला मागणी असून, ज्यूट बॅगचा उठाव होत नसल्याने कारखान्यांचे पैसे अडकून पडताहेत. तेव्हा ताग उत्पादक शेतकर्‍यांना थेट मदत करून ज्यूट बॅगमधील पॅकिंगसाठी साखरेला वगळण्याची मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केली आहे.

देशात साखर उद्योगाचे मोठे जाळे असून, सर्वाधिक साखर उत्पादन घेण्यात भारत जगात अग्रस्थानी आहे. केंद्र सरकारने हंगाम 2023-24 मधील निर्णयानुसार 20 टक्के ज्यूट बॅगमध्ये साखर पॅकिंग करण्याचे धोरण राबविले आहे. चालू वर्ष 2024-25 मध्येही त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. पॉलिथील बॅगपेक्षा ज्यूट बॅगला 53 रूपये अधिक खर्च येतो. त्यामुळे सहकारी अथवा खासगी कारखान्यांच्या केंद्राच्या धोरणाची अंमलबजावणी करावयाची झाल्यास अधिक रक्कम गुंतवावी लागत आहे. ज्यूट बॅगमधील साखरेला व्यापार्‍यांकडून मागणी कमी आहे.

सांगली जिल्ह्यात 16 साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात गतवर्षी कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साधारणतः त्यातील 20 टक्के ज्यूट पॅकिंगमध्ये सक्तीचा विचार केला तर सुमारे 20 लाख क्विंटल साखर होईल. त्यासाठी ज्यूटची 40 लाख पोती लागतील. पॉलिथीन बॅगपेक्षा ज्यूट बॅगला 53 रूपये अधिक खर्च येतो. याचा विचार केला तर 21.20 कोटी रूपये कारखानदारांवर बोजा पडणार आहे. (सकाळ, 30.05.2024)