anekant.news@gmail.com

9960806673

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात ड्रोनने फवारणीचे प्रत्यक्षीक

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाचे उपस्थितीत एअरबोटस् एरोस्पेस या कंपनीने औषधे टॉनिक इत्यादी फवारणीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आज दि. 19/6/2024 रोजी कारखान्याचे शेती स्टाफ व इतर स्टाफ यांना दाखवणेत आले. या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळेत जास्ती जास्त क्षेत्राची फवारणी होवून मजुर तुटवडयावर पर्याय निधणार असून, व औषधामध्ये कपात होवून उत्पादनात मोठया पमाणात वाढ होणार असलचे कंपनीमार्फत सांगण्यात आले. या ड्रोन फवारणीचा लाभ तालुक्यातील शेतक-यांना कश्या प्रकारे करून घेता येईल यावर शेती खात्यामार्फत सर्व्हे करून मा. संचालक मंडळ भविष्यात सकारात्मक निर्णय घेणार असलेबाबत चर्चा करणेत आली.