टेंभूर्णी ः आष्टी शुगर लि. (सिताराम शुगर युनिट 2) या कारखान्याच्या गळीत हंगाम सन 2024-25 चा मिल रोलर पूजन कार्यक्रमास धनश्री परिवार, सिताराम परिवार व आष्टी शुगरचे मुख्यय प्रवर्तक शिवाजीराव काळुंग्रे सर व चेअरमन शोभाताई काळुंगे यांचे शुभ हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, संचालक सुयोग गायकवाड आदि प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कारखान्याने 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेऊन त्यासाठी लागणार सर्व ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा यांचे करार करून त्यांना अॅडव्यहान्स वाटप करण्यात आला आहे याची माहिती चेअरमन यांनी दिली. सदर गाळपासाठी लागणार्या उसाच्या नोंदी झाल्या आहेत. तरी जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी उसाच्या नोंदी देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. (एकमत, 09.07.2024)