वडगाव मावळ ः श्री संत तुकाराम साखर कारखान्याचा सन 2024-25 गळीत हंगामकरिता मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांचे हस्ते करण्यात आले. कारखान्याने नवीन डिस्टलरी प्रकल्प हाती घेतला असून त्याचे उभारणीचे काम चालू आहे. सदरचा प्रकल्प कार्यान्वीत झालेनंतर कार्यक्षेत्रातील सर्व शेतकर्यांना त्याचा फायदा होईल. गळीत हंगाम 2024-25 करिता कार्यक्षेत्रामध्ये 5870 हेक्टर आर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप वेळेत होणेचे दृष्टीने कारखान्यातील सर्व मशिनरी देखभाल दुरूस्तीची कामे चालू आहेत. डिस्टलरी प्रकल्पही वेळेत कार्यान्वित होईल अशी आशा बापूसाहेब भेगडे यांनी व्यक्त केली. (पुढारी, 10.07.2024)