सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर-अकलूज या कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 च्या रोलर पुजनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 18/07/2024 रोजी कारखान्याच्या संचालिका मा.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.शंकरराव माने देशमुख, मा.सुजाता शिंदे, मा.हर्षाली निंबाळकर, मा.रामचंद्र सावंत पाटील, मा. विजयकुमार पवार, मा. लक्ष्मण शिंदे, मा.सतीश शेंडगे, मा. नानासाहेब मुंडफणे, मा.विजयकुमार पवार, मा.विराज निंबाळकर, मा. महादेव क्षीरसागर, मा.अमरदीप काळकुटे, मा. गोविंद पवार, मा. जयदीप एकतपुरे, मा.रामचंद्र ठवरे, मा.रणजीत रणवरे, मा. पांडुरंग एकतपुरे, मा. बाळासाहेब माने देशमुख, मा. दत्तात्रय चव्हाण, मा. विनायक केचे, मा.राजेंद्र भोसले, मा.धनंजय चव्हाण, मा.नामदेव चव्हाण तसेच कारखान्याचे मा.कार्यकारी संचालकसाहेब मा.चिफ्अकौंटंट मा. शेतकरी अधिकारी, मा.चीफ इंजिनिअर, मा.चिफ केमिस्ट, मा.को. जनरेशन मॅनेजर तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.