anekant.news@gmail.com

9960806673

साखर उद्योगातील शून्य टक्के मिल ब्रेकडाउन

पाच साखर कारखान्यांच्या NSL शुगर ग्रुपने 19 आणि 20 जुलै 2024 रोजी मेसर्स एनएसएल शुगर लि. कोप्पा जि.मंड्या, कर्नाटक येथे वरील महत्त्वाच्या विषयांसह दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
साखर उद्योगातील शून्य टक्के मिल ब्रेकडाउन या विषयावर व्याख्यान देणासाठी महाराष्ट्रातील प्रथितवश तांत्रिक सल्लागार श्री.डब्ल्यू.आर.आहेर होते .त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिबंधात्मक देखभाल पद्धतींनी ब्रेकडाउनच्या अडचणींवर मात कशी करावी ,तसेच शून्य टक्के मिल ब्रेकडाउन संकल्पना रूजविण्यासाठी या विषयावर चर्चा केली. श्री. आहेर यांनी परिसंवादात प्रगत उभारणी पद्धती आणि मिल ऑपरेशन्सवर सखोलपणे भाष्य केले. वरिष्ठ व्हीपी श्री. अरुलप्पन, व्हीपी तांत्रिक श्री. राजशेखर, मेसर्स एनएसएल शुगर लि.कोप्पा युनिटचे युनिट प्रमुख श्री. रामचंद्रराव, डीजीएम कोप्पा युनिट श्री शिवरामू आणि एनएसएल ग्रुप बेंगलोरचे शांतीभूषण दास व्यवस्थापक एचआर उपस्थित होते. व्याख्यानासाठी एनएसएल ग्रुपच्या पाच साखर युनिटचे चिफ इंजिनिअर,, चिफ केमिस्ट आणि केमिस्ट आणि अभियंते उपस्थित होते. सेमिनारमध्ये ब्रिक्स कर्वच्या महत्त्वावर सखोल चर्चा झाली. श्री. आहेर यांनी परिसंवादात सर्व उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन एनएसएल साखर उद्योगात शून्य टक्के मिल ब्रेकडाउन संकल्पना रूजविली. श्री.शांतीभूषणदास व्यवस्थापक एचआर यांनी आभार प्रदर्शन केले.