anekant.news@gmail.com

9960806673

विलास साखर कारखाना तोंडार येथे मिल रोलरचे पूजन

लातूर : प्रतिनिधी

विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार, (ता.उदगीर) येथील कारखान्याच्या येणा-या गळीत हंगाम सन २४-२५ साठीची तयारी आघाडीवर असून गळीत हंगाम लवकर व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली जात आहे. गळीत हंगाम तयारीचा एक भाग म्हणून सोमवार दि. २९ जुलै रोजी मिलरोलर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मिलरोलरचे पूजन करुन कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावर्षी पाऊस वेळेवर आणि चांगला पडत असल्याने ऊस दर्जेदार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. यामूळे ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने हंगामपूर्व कामाची तयारी करण्यात येत आहे. याकरीता कारखाना यंत्रासामर्गी दुरुस्ती, उभारणी, साफसफाई करण्यासाठी सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

मिलरोलर बसविण्याच्या कार्यक्रम प्रसंगी व्हा. चेअरमन रवींद्र काळे, युनीट नं. २ चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, जिल्हा महीला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, संचालक मारुती पांडे तसेच कारखान्याचे संचालक गोंिवद बोराडे, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, रंजित पाटील, अनंत बारबोले, अमृत जाधव, सुर्यकांत सुडे, गोंिवद डुरे, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, निमंत्रीत संचालक ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, राजेंद्र पाटील, विनोबा पाटील, संतोष तिडके, मन्मथ किडे, मन्सुरखां पठाण, श्रीकांत पाटील ऊसउत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

लोकनेते विलासराव देशमुख यांचा प्रेरणेतून उभा राहिलेला मांजरा परीवारातील विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. येणा-या हंगामासाठी कारखाना अंतर्गत बंद हंगाम काळातील सर्व तांत्रीक कामे प्रगतीपथावर आणि अंतीम टप्प्यात आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी दिली आहे. या हंगामात कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणाची उभारणी करण्यात आली आहे, असे कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींंद्र काळे यांनी
सांगीतले.