शिरोळ ः येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी रघुनाथ देवगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सभा पार पडली. यावेळी निवडी झाल्या.
कारखान्याचे उपाध्यक्ष पद हे नेहमीच कर्नाटक राज्यातील संचालकांना देण्याचा निर्णय माजी अध्यक्ष स्व.डॉ. सा.रे. पाटील यांनी घेतला. तीच भूमिका गणपतराव पाटील यांनी पुन्हा एकदा घेत शरदचंद्र पाठक यांना उपाध्यक्ष पदाची संधी दिली. अध्यक्षपदी निवड झालेले रघुनाथ पाटील हे गेली 22 वर्षे, तर उपाध्यक्षपदी निवड झालेले शरदचंद्र पाठक हे 25 वर्षे संचालक आहेत. (लोकमत, 27.07.2024)