anekant.news@gmail.com

9960806673

स्वाभिमानीची 25 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरला ऊस परिषद

राजू शेट्टी ः गतवर्षीचे 200 अगोदर द्या, नंतरच हंगाम सुरू करा

उदगाव ः गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी 25 ऑक्टोबरला जयसिंगपूरयेथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनाला यश आल्यामुळे आता कारखानदार पैसे देत आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्‍ता प्रतिटन 200 रूपये द्यावा मगच कारखाने सुरू करावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदगाव येथील ककल्पवृक्ष गार्डन सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळाव्यात केली. (लोकमत, 06.10.2024)