anekant.news@gmail.com

9960806673

पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातून बियाणे विक्री वाटप सुरू

बारामती ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावच्या ऊस बियाणे विक्री व वाटपाचा शुभारंभ सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप को 86032 या वाणाचे जनक डॉ. आर.वाय. जाधव, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल जाधव, कार्तिक अडसूळ, गणपत वायाळ, रमेश काटे, राजाराम भोसलेे, संदीप गायकवाड यांनी फुले 265 या ऊस वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देण्यात आली.
सोमेश्‍वर कारखाना स्थापनेपासून तो पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी उसाची कमतरता भासत होती. इतर जिल्ह्यातून गेटकेन ऊस आणावा लागत होता. परंतु, पाडेगाव संधोशन केंद्राने 2007 मध्ये प्रसारित केलेल्या फुले 265 वाणामुळे आणि सन 2009-10 मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व निरा नदी काठच्या चोपन जमिनीमध्ये फुले 265 या वाणाची लागवड झाली. त्यामुळे कारखाना ऊस पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला. याकामी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकु मार पाटील यांचे सहकार्य लाभले. तर साखर उतारा वाढवण्यासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची मदत झाली.
पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या फुले 265 को 86032, फुले 10001, फुले 9057 व मागील 3 वर्षात प्रसारित केलेले नवीन वाण फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 आणि फुले 15006 हे नवीन वाण सोमेश्‍वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत आहे. राज्यातील सर्व शेतकर्‍यांनी नवीन वाणांची जास्तीत जास्त लागवड करून उत्पादनात वाढ करावी. संशोधन केंद्राने विकसीत केलेले आधुनिक ऊस लागवड व खोडवा ऊस व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर करावा. - पुरूषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्‍वर साखर कारखाना (पुढारी, 11.10.2024)