कसबा बावडा :
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक मा.श्री. शिवाजी रामा पाटील, लाटवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संचालक मा.आ.श्री. महादेवराव महाडिक यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ठीक १०.०१ वाजता संपन्न झाला.
या प्रसंगी बोलताना कार्यकारी संचालक यांनी कारखाना मा.आ.श्री. महादेवराव महाडिक साहेब यांचे नेतृत्वाखाली कारखाना चांगल्या पध्दतीने प्रगती करीत असून या हंगामात ५.०० लाख मे. टन गळीत आणि १२.२५ टक्के साखर उताऱ्याचे उद्दिष्ट असून ते साध्य करणेसाठी सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभी केली असून कारखान्यातील काही तांत्रिक बदलामुळे हंगामात अपेक्षित रिझल्ट मिळतील असा आशावाद व्यक्त केला. पुढील हंगामात १८.५ मे. वॅट क्षमतेच्या सहविज निर्मिती प्रकल्प उभारणी पूर्ण होणार असून ५००० मे. टन प्रतीदिन गाळप क्षमतेचे आधुनिकीकरण करणेत येणार असलेने कारखान्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या अनुषंगीक कामे वेळेत पूर्ण करून द्यावीत असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
त्यानंतर कारखान्याचे संचालक मा. श्री. शिवाजी रामा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक तसेच वसंतदादा ऊस तोडणी वाहतुक संस्थेचे व श्री छ. राजाराम नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री छ. राजाराम कारखाना नोकर सह. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी सभासद बंधू भगिनी, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार आदी उपस्थित होते.