केंद्रीय मंत्री गडकरींना साखर उद्योगाकडे साकडे
पुणे ः साखरेची किमान विक्री किंमत अनेक वर्षांपासून मागणी करूनही वाढवली जात नाही. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे शॉर्ट मार्जिन (अपुरा दुरावा) झपाट्याने वाढत आहेत. ही समस्या केंद्रासमोर मांडून आम्ही थकलो आहोत. आता तुम्हीच आमचे नेतृत्व करावे, असे साकडे साखर उद्योगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.
महाराष्ट्र राज्य सहक ारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी सांगितले, की रास्त व किफायतशीर दर पाच वेळा वाढवले गेले. परंतु साखरेची एमएसपी केवळ दोन वेळा वाढवली. यातून साखरेचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. खर्च भरमसाठ आणि नफ कमी होताच आर्थिक व्यवस्थापनात अपुरा दुरावा तयार होतो. केवळ साखर निर्मितीवर अवलंबून असणारे कारखाने शॉर्ट मार्जिनच्या चक्रात वेगाने गुरफटत आहेत. त्यामुळे एमएसपी न वाढविल्यास काही कारखाने भविष्यात कायमचे बंद पडतील. ही समस्या आम्ही अलीकडेच मंत्री गडकरी यांच्या कानावर टाकली आहे. त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे शॉर्ट मार्जिनच्या समस्येवर वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो. चिंता व्यक्त केले आहे. विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार अपुरा दुराव्यामुळे सहकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील कारखान्यांचे नियोजन विस्कळीत होत आहेत. साखरेची किंमत वाढविल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली. परंतु त्या प्रमाणात ऊस उपलब्धता नाही. परिणामी साखर कारखान्यांंचे गाळप दिवस १५० दिवसांवरू न घटून तीन महिन्यांच्याही खाली आले आहेत. दुसर्या बाजूला कमी दरात साखर विक्रीचे बंधन कायम आहे. (अॅग्रोवन, ०१.०३.२०२५)