आरसा दाखवी प्रतिमा आपली खरी
आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी
म्हणून आरसा फोडणे बरे वाटेना
खरे बोलणे ,खरे वागणे दिसेना॥१॥
सत्य पराजित करणेही जमेना
याची प्रतिमा आरशातही दिसेना
दुश्मनाशीही प्रेम करणे जमेना
दुस-यास दुःख देणे अवघड वाटेना ॥२॥
भ्रामक प्रतिमा भिंगातूनही दिसेना
जगमिथ्या हे आरशात दिसेना
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
आरशात दिसेना त्याचेही माप॥३॥
टिव्ही सिनेमा आरशाचे रुपं खोटे
दुःख दारिद्र्य तयातभासमान वाटे
त्यातील श्रीमंतीच्या नव्या कल्पना
आम्हाला वाटती या पोकळ वल्गना ॥४॥
आशेचा किरण कुठे दिसेल
नवी जगरहाटी नजरेस पडेल
माणसाने माणसाशी माणसासम वागणे .
हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे॥ ५॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई
9958782982