anekant.news@gmail.com

9960806673

मुक्तेश्‍वरमध्ये 2 लाख टन गाळप

शेंदूरवाडा ः यावर्षीच्या गळीत हंगामात मुक्तेश्‍वर शुगरने 100 दिवसांत 2 लाख 35 हजार टन उसाचे गाळप केेले असून सरासरी साखर उतारा 9.75 टक्के आहे. तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना यावर्षीही अत्यल्प पावसामुळे उसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, एकरी सरासरी उत्पादन कमी येत आहे. यावर्षी मुक्तेश्‍वरकडे नोंद असलेला गाळपायोग्यऊस संपेपर्यंत कारखाना चालू राहणार असून, 4 लाख टन उसाचे गाळप करणार असल्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ यांनी सांगितले.

परिसरातील जास्तीतजास्त शेतकर्‍यांचा ऊस गाळपास आणण्याचे नियोजन असून, शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे प्रतिटन 2700 दर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होईल. - लक्ष्मणराव गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (सकाळ, 14.02.2024)