anekant.news@gmail.com

9960806673

भारतीय शुगर संस्थेच्या व्हाईस प्रेसिडंटपदी मनोहर जोशी

हुपरी ः येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची भारतीय शुगर संस्थेया व्हाईस प्रेसिडंटपदी (व्यवस्थापन) निवड करण्यात आली. यावेळी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपुरचे माजी संचालक नरेंद्र मोहन (तंत्रज्ञान) आणि डी.एम. रासकर (साखर कारखाना) यांचीही निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र आ.प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्याात आले.
मनोहर जोशी यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेवर कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह.बँक व गणेश सह.बँकेचे ते तज्ज्ञ संचालक आणि दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस पुणे या संस्थेवर दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर विभागातून स्वीकृत संचालकपदी कार्यरत आहेत. साखर उद्योगातील प्रशासकीय, आर्थीक, तांत्रीक बाबीतील जागतिक स्तरावरील घडामाडींचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारतीय शुगर या संस्थेच्या व्हाईस प्रेसिडंट (व्यवस्थापन) पदी त्यांची निवड झाली आहे. (पुण्यनगरी, 01.06.2024)