anekant.news@gmail.com

9960806673

खटाव माण अ‍ॅग्रो वाहतूक कराराचा शुभारंभ


मायणी ः पडळ, येथील खटाव माण तालुका अ‍ॅग्रो प्रोसेसिंग लि. या साखर कारखान्याच्या सन 2024-25 च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी आणि वाहतूक करारांचा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर चेअरमन प्रभाकर घार्गे , को-चेअरमन मनोज घोरपडे व कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

कारखान्याने मागील गळीत हंगामात 6 लाख 18 हजार मे.टन उसाचे गाळप केले. साखर उतारा 11.68 टक्के मिळाल्याने 6 लाख 70 हजार 140 क्विंटल एवढे विक्रमी साखर उत्पादन झाले. यामध्ये कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कामगारांचे सहकार्य लाभल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले. (प्रभात, 13.06.2024)