सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 51 व्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पुजन समारंभ राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार बाळासाहेब पाटील आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी संपन्न झाला.
प्रारंभी कारखान्याचे संचालक डी.बी.जाधव यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
याप्रसंगी व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, मनसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, अविनाश माने, वसंतराव कणसे, रामचंद्र पाटील, पै.संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, रामदास पवार, संतोष घार्गे, लहूरज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, सौ.शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.