anekant.news@gmail.com

9960806673

मुळा रोलर पूजन

सोनई ः मुळा साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन मंगळवार दि. 9 जुलै रोजी कारखान्याचे ज्येष्ट संचालक नारायण लोखंडे व बबन दरंदले यांच्या हस्ते करण्यात आले. मागील गळीत हंगामामध्ये कारखान्याने 7 लाख 88 हजार मे.टन ऊस गाळप केले आहे. गतवर्षी राज्यामध्ये पाऊसमान कमी झाल्याने कार्यक्षेत्रात ऊस लागवडीमध्ये काही अंशी घट झाली. त्यामुळे येणारा गळीत हंगाम कमी कालावधीचा राहण्याची शक्यता आहे.

येत्या गळीत हंगामात कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गळीत करण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनानेे नियोजन केले असून, त्यानुसार ऊसतोड वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम चालू आहे. तसेच कारखाना मशिनरीचे ओव्हर ऑईलिंगचे कामे जोराने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिल रोलरचे देखभाल दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. (पुढारी, 10.07.2024)