anekant.news@gmail.com

9960806673

श्री तात्यासाहेब कोरे वारणा : २०२४-२५ या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४-२५ च्या तयारी अंतर्गत मिल रोलर पूजन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचे हस्ते संपन्न झाले. वारणा सहकारी साखर कारखान्याची आगामी गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट असुन त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले...

यावेळी सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील (सर),वारणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव पाटील,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर.भगत यांच्यासह सर्व खात्याचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.