पुणे- 31- वेस्ट इंडियन शुगर मीलस् असोसिएशन, पुणे या खाजगी साखर कारखाना संघटनेचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर, रांजणी या खाजगी साखर कारखान्यास साखर उद्योगामध्ये ‘‘संशोधन, विकास आणि नाविण्यपूर्ण उपक्रम’’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देवून नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांना पुणे येथे आयोजीत कार्यक्रमात भारत सरकारच्या नव व अपारंपारिक उर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगिता कस्तुरे, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त, डॉ. कुणाल खेमनार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, डॉ. विजय सुर्यवंशी व माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे शुभहस्ते दि. 31 ऑगष्ट 2024 रोजी प्रदान करण्यात आला.
नाविन्यपूर्ण उत्पादनांची दखल घेवून ‘‘संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रम’’ हा पुरस्कार वरील मान्यवरांच्या उपस्थितीत नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड, बालाजी तट, दिलीप भिसे आणि सरव्यवस्थापक यु.डी.दिवेकर उपस्थित होते.
सदरचा पुरस्कार मिळाले बद्दल सर्व स्तरातील मान्यवरांनी बी.बी.ठोंबरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास आवर्जून शुभेच्छा दिल्या.