anekant.news@gmail.com

9960806673

‘विस्मा’च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे यांची फेरनिवड

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात ‘विस्मा’च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे यांची फेरनिवड झाली आहे. तसेच, उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील १३३ खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व विस्मा करते. पुण्यात शनिवारी (ता. १४) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवे कार्यकारी मंडळ बहुमताने निवडण्यात आले. विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

त्यांनी २०२४-२७ या तीन वर्षांसाठी घोषित केलेली नवी कार्यकारिणी अशी : बी. बी. ठोंबरे, नॅचरल शुगर, यवतमाळ (अध्यक्ष), आमदार रोहित पवार, बारामती ॲग्रो पुणे (उपाध्यक्ष), पांडुरंग राऊत, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना,पुणे (सरचिटणीस) तसेच सदस्यपदी महेश देशमुख- लोकमंगल इंडस्ट्रीज ग्रुप सोलापूर, सदस्यपदी खासदार बजरंग सोनवणे, येडेश्वरी ॲग्रो, बीड, रणजीत मुळे- गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन,

अहमदनगर, यशवर्धन डहाके- पराग ॲग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्ट्स, पुणे, गौरवी भोसले - जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, लातूर, योगेश पाटील - अथणी शुगर्स, सातारा, राहुल घाडगे- गुरुदत्त शुगर्स, कोल्हापूर,

रोहित नारा - सद्गुरु श्री श्री साखर कारखाना, सांगली, याशिवाय तज्ज्ञ सदस्यपदी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड व रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता यांची निवड करण्यात आली.