anekant.news@gmail.com

9960806673

व्यथा साखर कामगाराची

मी आहे साखर कामगार ,साखर कामगार
कुणीही हाका ,ठोका ,जणू मी वेठबिगार
मी आहे स्कील्ड, सेमीस्कील्ड,कायम,सिझनल,टेम्पररी,
बदली,कंत्राटी,अनस्कील्ड, उक्ता, धरणग्रस्त, बिगारी ॥१॥
आमचा अजून पुरा नाही पाचवा वेतन आयोग
सरकार स्थापन करतयं आठवा वेतन आयोग
लुळया पांगळ्या आमच्या कामगार संघटना
पाटील ,पवार कमिटी हीच आमची खरी घटना॥२॥
संघटनेला मिळे वाढीव वर्गणी आपोआप
मागे सारती मग वेतन आयोग चुपचाप
आमचा अन टाटाचा रात्रपाळी भत्ता
यातील तफावतीवर नाही आमची सत्ता ॥३॥
सवलती मिळतील ग्रामीण भागातील
कामाची गुणवत्ता पाहिजे जगातील
इलेक्शनला चेअरमनचा प्रचार करा
नाहीतर आयुष्यात घरी बसून हरीहरी करा ॥४॥
मी साखर कामगार आता जीव किती जाळू
दादा,नाना,आबा अन साहेब व्हा कनवाळू
आयटीच नाॅलेज वापरा कारखान्यावर
कामगाराला नका सोडू आता वा-यावर ॥५॥

रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई
9958782982