मजूर टंचाईचा परिणाम ः गुळाला अपेक्षित दर नसल्याने उत्पादकांची पाठ
सांगली ः तालुक्यातील गुर्हाळघरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. परंतु मजुरांची टंचाई, गूळ उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर नाही. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी गूळ तयार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी यंदाच्या हंगामात शिराळा तालुक्यात गुर्हाळघरांना ब्रेक लागला आहे.
शिराळा तालुक्यातील कोकरूड, मणदूर, बिळाशी, सागाव, कणदूर, मांगरूळ या भागात 9-10 वर्षांपूर्वी सुमारे 100 हून अधिक गुर्हाळघरे होती. तालुक्यात दर्जेदार गूळ निर्मिती करण्यासाठी इथल्या शेतकर्यांचा हातखंडा आहे. गेल्या 6 वर्षापर्यंत तालुक्यात 30-40 गुर्हाळघरे सूरू व्हायची. दर्जेदार गुळाला बाजारात चांगली मागणी असून उठावही होत होता.
गुर्हाळ घरात काम करणार्या मजुरांची टंचाई भासू लागली. त्यातूनही गुर्हाळघर मालकांनी स्थानिक मजुरांची मदत घेऊन गुळनिर्मिती करण्यास सुरूवात केली. मात्र, मजुरांच्या कमतरतेमुळे गतवर्षी तालुक्यात अवघी पाचच गुर्हाळघरे सुरू झाली. अडची ते तीन टन उसापासून सुमारे 270 किलो गुळनिर्मिती होते.
मात्र यंदाच्या हंगामात गूळ निर्मितीसाठी लागणारे मजूर मिळाले नाहीत. त्यातच गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने दसर्यानंतर तालुक्यातील गुर्हाळघर मालकांनी गूळ निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील गुर्हाळघरांना सध्या ब्रेक लागला आहे.
उत्पादन खर्चात वाढ - 2-3 वर्षांपूर्वी एक किलो गूळ तयार करण्यासाठी 8-9 रू पये खर्च यायचा. गेल्या वर्षभरापासून गूळ निर्मितीला लागणार्या आणि मजुरांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च प्रतिकिलोस 2 ते 3 रूपयांनी वाढला आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढला पण गुळाचे दर वाढले नाहीत. या सार्याचा परिणाम गूळ निर्मितीवर झाला आहे.
गूळ निर्मितीसाठी ऊस उपलब्ध आहे. पण मजुरांची टंचाई आणि गूळ निमिर्र्तीचा उत्पादन खर्च यामुळे गूळ निर्मितीकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गुर्हाळघर सुरूू केले नाही. - गजानन शेटे, गुर्हाळघर मालक, कोेकरूड जि. सांगली (अॅग्रोवन, 05.01.2024)