anekant.news@gmail.com

9960806673

क्षमता अधिक, तोडणी यंत्रणा कमी, कारखान्यांना फटका

दररोज दीड लाख क्षमता असताना उसाचे 1 लाख 10 हजार मे.टन गाळप
सोलापूर ः प्रतिदिन 1 लाख 36 हार गाळप क्षमता असताना मागील वषीर्र् दररोज एक लाख 45 हजार मे.टन गाळप होत होते तर यावर्षी गाळप क्षमता वाढून 1 लाख 56 हजार मे.टन इतकी असताना दररोज 1 लाख 10 हजार मे.टन गाळप होत आहे. ऊसतोडणी यंत्रणा कमी असल्याचा फटका जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना यंदा बसत असून 60 दिवसांत 60 लाख मे.टन गाळप झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी 34 साखर कारखान्यांनी गाप हंगाम घेतला आहे. मागील वर्षी गाळप घेतलेल्यापैकी मकाई-करमाळा, मातोश्री लक्ष्मी शुगर-अक्कलकोट हे साखर कारखाने मागील वर्षीची एफआरपी थकल्याने व ऊसतोडणी यंत्रणा मिळत नसल्याने सुरू झाले नाहीत. वैरागचा संतनाथ, मंद्रुपचा लोकशक्ती, स्वामी समर्थ-अक्कलकोट व आदिनाथ-करमाळा हे साखर कारखानेही बंद अवस्थेत आहेत. उर्वरित 34 साखर कारखाने 1 नोव्हेंबर व त्यानंतर आठवडाभरात सुरू झाले आहेत.
मागील वर्षीपेक्षा यंदा दररोज 20 हजार मे.टन गाळप क्षमता वाढली असली तरी गाळप मात्र कमी क्षमतेने होत आहे. दररोजची गाळप क्षमता 1 लाख 56 हजार मे.टन असल्याने दररोज किमान 1 लाख 56 हजार मे.टन असल्याने दररोज किमान 1 लाख 65 हजार मे.टन गाळप होणे आवश्यक अपेक्षित आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या 34 पैकी 10 ते 12 साखर कारखान्यांकडे ऊसतोडणी यंत्रणा पुरेशी आहे. उर्वरित 20 ते 22 साखर कारखान्यांकडे ऊसतोडणी यंत्रणेचा अभाव आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांची ऊसतोडणी यंत्रणा 15 जानेवारीनंतर रिकामी होईल व ती आपल्या साखर कारखान्यांना उपयोगी पडेल, अशी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची अपेक्षा आहे. जर ही यंत्रणा मिळाली तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे दररोजचे गाळप वाढेल, असे कारखानदारांचे मत आहे.
1 लाखापेक्षा कमी क्षमतेचे गाळप कारखाने - साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी लोकमंंगल-बीबीदारफळ, औदुंबररावजी पाटील-आष्टी, इंद्रेश्‍वर व येडेश्‍वरी-बार्शी, भैरवनाथ-आलेगाव, ओंकार कारखाना-चांदापुरी, श्री संत कुर्मदास-माढा, सहकार शिरोमणी वसंतराव काळे-पंढरपूर या कारखान्यांचे गाळप 1 लाख मे.टन झालेले नाही. (लोकमत, 01.01.2024)