सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये सभासदांना अदा केले आहेत. परतीची ठेव १५० रुपये कपात, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरण एक रुपया कपात करून उर्वरित टनाला ३२० रुपये देण्यात येणार आहेत.तसेच २०१८-१९ च्या परतीच्या ठेवीची रक्कम १० कोटी, त्या आदीची परतीच्या ठेवीची रक्कम ४ कोटी ३० लाख असे एकूण १४ कोटी ३० लाख व त्यावरील व्याज १५ ऑक्टोबरपासून वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शनिवारी (दि. १२) अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव जगताप, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, सुनील भगत, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, प्रणिता खोमणे, कमल पवार, विक्रम भोसले, सचिन खलाटे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, बापूराव गायकवाड, विराज निंबाळकर उपस्थित होते.