वालचंदनगर ः येथील छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १० टक्के वेतनवाढ दिली आहे. वेतनवाढीचा पहिला पगार गुरूवार दि. ५ सप्टेंबर रोजी कामगारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. वेतनवाढ देणारा छत्रपती राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला असून छत्रपतीच्या कामगारांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह संचालक मंडळ, कायकारी संचालक अशोक जाधव अनुमंत करवर यांचे अभिनंतर केले.
छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे यांनी सांगितले की, कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर व सीासद व कामगारांच्या घराच्या चुलीतून निघणारा धूर एकच असतो. कारखाना चालला तर कामगार व सभासदांचा प्रपंच चालणार आहे. कामगार व सभासद एकाच रथाची दोन चाके आहेत. त्रिपक्षीय समितीच्या कराराची अंमलबजावणी करून पगारवाढ देणारा छत्रपती कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. (सकाळ, ०५.०९.२०२५)