anekant.news@gmail.com

9960806673

विनापरवाना गाळप बंद करा


प्रादेशिक सहसंचालकांचे निर्देश, आदेश मोडल्यास परवाना नाही
मुंबई ः यंदाचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यापूर्वी विनापरवाना गाळप हंगाम सुरू करण्यात येणार असून त्यापूर्वी विनापरवाना गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांनी गाळप तत्काळ बंद करावे, असे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत.
साखर आयुक्त कार्यालयस्तरावर विनापरवाना कारखाना हंगाम सुरू केल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. तर अनेक कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत परवानगी मागत आहेत. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे संबंधित नियोजेन आहे. त्यासंबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत.
त्यामुळे अद्याप एकाही साखर कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही, याची नोंद सर्व कारखान्यांनी घेऊन त्यांचा गाळप हंगाम, परवाना मिळाल्यानंतरच सुरू करावा, असे निर्देश सहसंचालकांनी दिले आहेत. तसेच, ज्या कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केले असून त्यांनी ते तत्काळ बंद करावे, अन्यथा त्यांना चालू हंगामात गाळप परवाना देण्यात येणार नाही, तसेच त्यांच्याविरूद्ध पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा साखर सहसंचालकांनी दिला आहे. (अ‍ॅग्रोवन, २१.१०.२०२५)