जळगाव जिल्हा बँकेचा कारखाना विक्रीचा निर्णय, ३० वर्षांचा वनवास संपणार, शेतकर्यांच्या आशा पल्लवित
जळगाव ः गेल्या तीन दशकापासून कुलूपबंद असलेल्या वसंत साखर कारखान्याच्या पुनरूज्जीवनासाठी अखेर हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेने या कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून, यामळे सात तालुक्यांमधील शेतकरी आणि सुशिक्षीत बेरोजगाराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कारखान्याच्या विक्रीचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ नेते संचालक आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील, गुलागराव देवकर, जयश्री महाजन यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.
कारखान्याची मूळ किंमत ठरवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला कळविले आहे. त्यांची तज्ज्ञ टीम लवकरच कारखान्यात येऊन यंत्रसामग्री आणि जमिनीची पाहणी करेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून विक्रीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वसंत सहकारी साखर कारखाना हा या परिसरातील शेतकर्यांचा कणा आहे. गेली ३० वर्षे हा प्रकल्प बंद असल्याने शेतकर्याचें आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले. माझे वडील स्व. मुरलीधन पवार यांचेे हे स्वप्न होते की हा कारखाना सदैव सुरू राहावा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही आता हा कारखाना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून नवीन गुंतवणूकदार हा कारखाना तिथेच सुरू करेल. आमचा मुद्दा नफा कमवणे नसून शेतकर्यांचा ऊस गाळला जावा आणि स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा हाच आहे. - संजय पवार, जळगाव जिल्हा बँक (लोकमत, २५.०१.२०२६)