anekant.news@gmail.com

9960806673

मंडलिक कारखान्याकडून सर्व ऊस बिले अदा ः अध्यक्ष संजय मंडलिक

हमिदवाडा ः येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने सन २०२५-२६ या गळीत हंगामातील सर्व ऊस बिले तसेच तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखाना अध्यक्ष माजी खा. संजय मंडलिक यांनी दिली. यापूर्वी १५ जानेवारीअखेरची ऊस बिले अदा केली आहेत. आता १६ जानेवारी ते गळीत हंगाम संपेपर्यंतच्या गाळप उसास एफआरपी प्रमाणे प्रतिटनास ३४१० रूपये प्रमाणे होणारी बिलाची रक्कम २९ कोटी ९० लाख ९१ हजार ८३२ रूपये संबंधित ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे.
या हंगामातील सर्व म्हणजे ५ कोटी १ लाख २८ हजार ७९५ इतकी संपूर्ण तोडणी वाहतुकीची बिलेसुद्धा संबंधित तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. (पुढारी, ०५.०४.२०२६)