anekant.news@gmail.com

9960806673

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण कायम

कोल्हापूर ः देशातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण एप्रिल २०२६ मध्येही २० टक्क्यंवर कायम राहिले आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत तेल विपणन कंपन्यांना या महिन्यात ९०.१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. पेट्रोलियम नियोजनावर आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे.
माहितीनुसार तेल विपणन कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी (पहिले चक्र) देशभरातील उत्पादकांनी सादर केलेल्या १७७६ कोटी लिटर इथेनॉलच्या प्रस्तावापैकी सुमारे १०४८ कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले आहे. यापूर्वी १०५० कोटी लिटरच्या पुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.
कच्च्या मालाच्या बाबतीत, मक्याचा वाटा सर्वाधिक ४५.६८ टक्के (सुमारे ४७८.९ कोटी लिटर) आहे, त्यानंतर एफसीआय तांदूळ २२.५ टक्के (सुमारे २३३.३ कोटी लिटर), उसाचा रस १५.८२ टक्के (सुमारे १६५.९ कोटी लिटर), बी-हेवी मळी १०.५४ टक्के (सुमारे ११०.५ कोटी लिटर), खराब झालेले अन्नधान्य ४.५४ टक्के (सुमारे ४७.६ कोटी लिटर) आणि सी-हेवी मळी १.१६ टक्के (सुमारे १२.२ कोटी लिटर) यांचा समावेश लागतो.
भारताने गेल्या काह वर्षात पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण सातत्याने वाढवले आहे. १० टक्क्यांचे लक्ष्य जून २०२२ मध्ये वेळेच्या आधीच साध्य करण्यात आले. २०२२-२३ मध्ये मिश्रणाचे प्रमाण १२.०६ टक्के, २०२३-२४ मध्ये १४.६० टक्के आणि २०२४-२५ मध्ये १९.२४ टक्क्यांपर्यंत वाढले.
इथेनॉल मिश्रणातील सातत्यपूर्ण वाढीमुळे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली आहे, एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता आता मिश्रण कार्यक्रमासाठी आवश्यक आलेल्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे उद्योग क्षेत्रातील घटक कमी वापरल्या जाणार्‍या क्षमतेचे कारण देत, मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याची मागणी करत आहेत. (अ‍ॅग्रोवन, ३०.०५.२०२६)