anekant.news@gmail.com

9960806673

खानदेशात ७५ टक्के ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत

जळगाव ः खानदेशात यंदा ऊस गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप ७० ते ७५ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची तोडणी गतीने सुरू आहे. परंतु गाळपाच गती लक्षात घेता यंदाही गाळप एप्रिलपर्यंत सुरू राहील असे दिसत आहे.
आणखी किमान २५ ते २८ लाख टन उसाची तोडणी होणार आहे. त्याचे गाळप झाल्यानंतर साखरेचे अधिकचे उत्पादनही खानदेशात दिसणार आहे. खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. यात सर्वाधिक सुमारे १६ हजार हेक्टर नंदुरबार जिल्ह्यात पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. तर धुळ्यात ५ हजार हेक्टरवर आहे. यातील २५ ते ३० टक्के गाळप झाले आहे.
नंदुरबारात ३ कारखाने सुरू आहेत. यात समशेरपूर येथील कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. डोकारे येथील कारखान्याचे गाळपाही सुमारे दीड लाख टन एवढे झाले आहे. तसेच एक खांडसरीदेखील तळोदा भागात आहे. जळगाव जिल्ह्यात २ कारखाने सुरू आहेत. यात मुक्ताईनगर येथील कारखाना व चहार्डी येथील कारखाना गाळप करणार आहे. भोरस येथील कारखान्याचे गाळप यंदा सुरू झालेले नसल्याची माहिती आहे. (अ‍ॅग्रोवन, ०६.१२.२०२५)