anekant.news@gmail.com

9960806673

मलप्रभा कारखान्याची २८ रोजी निवडणूक

१५ संचालकांची होणार निवड ः १३ पासून अर्ज भरण्यास प्रारंभ
बेळगव ः एमके हुबळीतील मलप्रभा साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक २८ रोली होणार असून १३ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यातून १५ संचालकांची निवड करण्यात येणार आहे.
गत काही दिवसांपासून एमके हुबळी साखर कारखान्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करत सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले आहे. राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्याचबरोबर कारभाराबाबात चौकशीचे आदेश बजावण्यात आले आहेत. यामुळे निवडणुकीत चूरस निर्माण होणार आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रभावती फकीरपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२ रोजी मतदार यादी प्रसित्र केली जाणार आहे. १३ ते २० पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून २२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. २८ रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (पुढारी, ०५.०९.२०२५)