पहिला टँकर रवाना ः अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन
इस्लामपूर ः कृष्णा कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्वीकार करू आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो. कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून टँकर ऑईल कंपनीकडे रवाना करण्यात आला. या वर्षीही कृष्णा कारखान्याने 1 कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. (पुढारी, 15.12.2024)