लासलगाव ः येथील केजीएस शुगर अॅण्ड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि. या साखर कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. लासलगावचे कृषी उद्योजक संजय चांगदेवराव होळकर यांच्या ग्रेनॉच इंडस्ट्रीज समूहाने ऑक्टोबरमध्ये हा कारखाना एनसीएलटीमार्फत विकत घेत ६ वर्षांहून अधिक काळ बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू केले.
रविवारी चेअरमन संजय होळकर, वैशाली होळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करत झाली. चेअरमन संजय होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत उसाची पहिली मोळी टाकून गाळप सुरू झाले. कारखान्याने यंदा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. (पुढारी, १५.१२.२०२५)