चंदीगड ः हरियाना सरकारने यंदा गाळपास येणार्या उसास प्रति टनास १५० रूपये वाढ केली. आता हरियानातील शेतकर्यांना ४ हजार रूपयांऐवजी ४ हजार १५० रूपये दर मिळणार आहेत. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी ही दिवाळीची भेट असल्याचे म्हटले आहे. ऊस पिकासाठी जाहीर केलेला हा देशातील उच्चांकी ऊस दर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही हरियाना सरकारने ऊस उत्पादक शेतकर्याना दिलेली दिवाळीची भेट असल्याचे श्री. सैनी यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हरियाणा सरकारने देशातील उच्चांकी उसाचा दर जाहीर करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि त्यांची आर्थिक समृद्धीसाठी हा एक मोठा निर्णय आहे. ही ऊस दरवाढ ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी दिवाळीची भेट आहे. त्यांची कठोर मेहनत आणि समर्पणाची दखल घेत राज्य सरकार त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करत आहे. हा निर्णय केवळ शेतकरी हितासाठी नाही तर राज्याच्या शेती अर्थव्यवस्थेला नवीन गती येईल, असा विश्वास श्री. सैनी यांनी व्यक्त केला. (अॅग्रोवन, २०.१०.२०२५)