माढा ः तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील राजवी ग्रो पॉवर प्रा.लि. या साखर कारखान्याचे २०२५-२६ या हंगामाचे रोलर पूजन चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते झाले. सावंत म्हणाले की, मागील सिझनचे ऊस बिल रूपये प्रतिटनाप्रमाणे अदा केले असून उर्वरित दसरा सणाला १५० रूपये व दिवाळी सणाला १५० रूपये असे मिळून ३०० रूपये प्रतिटन ऊस बिल देणार आहे.
राजवी ग्रो पॉवर प्रा.लि.चे व्हा. चेअरमन पृथ्वीराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गाळप हंगामासाठी तयारी सुरू असून मशिनरी मेंटेनन्स व ओंव्हर ऑइलिंगची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लागणारे ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. (पुढारी, ०१.०९.२०२५)